बाप
बाप


बाप नावाचं एक झाड
आता खूप थकलय
निष्पर्ण अबोल
खूपच सुकलय
पक्षी गेले दूरदेशी
पुर्वीचा तो आधारवड
स्वत:साठी आधार शोधतय
एकच ठेऊन आशा मनाशी
नजर लावून असते आकाशी
कधीतरी परततील पिलं
पुन्हा आपल्या घरट्याशी
बाप नावाचं एक झाड
आता खूप थकलय
निष्पर्ण अबोल
खूपच सुकलय
पक्षी गेले दूरदेशी
पुर्वीचा तो आधारवड
स्वत:साठी आधार शोधतय
एकच ठेऊन आशा मनाशी
नजर लावून असते आकाशी
कधीतरी परततील पिलं
पुन्हा आपल्या घरट्याशी