इच्छा
इच्छा

1 min

122
असावं असं कुणीतरी
हसणाऱ्या चेहऱ्यातील दु:ख जाणणारं
ओघळणारा पारिजात ओंजळीत झेलणारं
आरशाविणा प्रतिबिंब डोळ्यात पाहणारं
सायंकाळच्या मंद वेळी मन कातरणारं
अन् रात्रीच्या गडद अंधारात
मिटलेल्या पापण्यात
अलगद नाजुक स्वप्नं पेरणारं
खरंच असावं असं कुणीतरी...