STORYMIRROR

Nayana Gurav

Romance

3  

Nayana Gurav

Romance

भेट

भेट

1 min
53

वेडा पारिजात आज बहरला

रातराणीने गंध उधळला 

दिवस आजचा फुलून गेला 

क्षण सौख्याचा इथे थबकला

डोळ्यात तुझ्या मी मला पाहिले 

अन माझ्या नयनी तुला रेखीले 

देहावरती तव स्पर्शाने 

मोरपीस जणू अलगद फिरले 

तुझ्यात मी अन माझ्यात तू 

एक जाहली आपुली तनू 

भेदामधले अंतर मिटले 

श्वास आपुला एक जणू 

धुंद तुझ्या त्या मिठी मध्ये 

मी पणा माझा विरुन जावा

अन प्रेमगंधाने मंतरलेला 

दिन पुन्हा हा फिरुनी यावा.                       


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance