पाठवा शाळेत..
पाठवा शाळेत..
पाठवा शाळेत... कसे तुम्हा कळेना,कसे तुम्हा सुचेना पाठवा शाळेत, पाठवा मुलांना... मुलगा असो या मुलगी ठेवू नका अडाणी, लिहायवाचायला शिकू द्या, शिकून होऊ द्या ज्ञानी. पाटी दप्तर घेऊन येऊ द्या मुलांना, पाठवा मुलांना... शाळेमध्ये येऊन होतील सारे ज्ञानी शिकतील लिहायवाचायला खेळ आणि गाणी गोडी या शिक्षणाची,लागू द्या मुलांना, पाठवा मुलांना... शिक्षणाचं या महत्व तुम्हा आता कळू द्या शिकून व्हावं शहाणं ते ज्ञान ही मिळू द्या नको पुन्हा पुन्हा हे सांगणे कुणाला, पाठवा मुलांना... अडणी राहुनी नाही आता जमायचं शिक्षणावाचून कठीण फार जगायचं अडाणी असे राहाणे आवडेल का तुम्हाला, पाठवा मुलांना...
