शिकावे तुझ्याकडून...
शिकावे तुझ्याकडून...
1 min
435
शिकावे तुझ्याकडून कसे कर्तव्यनिष्ठ राहावे..
कसे सदैव कामासाठी तत्पर असावे...
शिकावे तुझ्याकडून कसे एकाग्र होऊन काम करावे..
काम करत असताना दुसरे काही ही न दिसावे..
शिकावे तुझ्याकडून कसे निष्ठावान असावे..
जे समोर आहे त्याला आधी प्राधान्य द्यावे..
शिकावे तुझ्याकडून कसे समाधानी असावे..
जे जसे आहे तसं स्वीकार त्याला करावे..
शिकावे तुझ्याकडून की जीवन कसे जगावे...
जसं आनंदी जगता येईल तसंच जीवन जगावे...