पाहून तुला गं
पाहून तुला गं
पाहून तुला गं बघ ना
बहर बावरा होतो
तुझ्या अवतीभोवती
गंध फुलांंचा दरवळतो
तुझ्या हळूवार स्पर्शाने
किती अलगद ऊमलते कळी
कशी हसरी होते बघं
तुझ्या गालावरची खळी
तुझ मधाळ हसण पाहुुुन
वाराही थांंबून जातो
तुझ्या अल्लड हुल्लड केसांना
उगच तो छेडुन घेतो
लावून घे तुझ्या केेेसांना
हा शरारती गजरा
आरसाही होतो बघ
पाहून तुला लाजरा

