STORYMIRROR

Pandit Warade

Romance

3  

Pandit Warade

Romance

अंतरंग

अंतरंग

1 min
215

रोज पाहते मी तुला 

माझ्या मागे फिरताना

आणि  लपून  छपून

न्याहाळून  पाहताना


पाहताना रोज रोज

कसा होतोस तू दंग

कधी कळणार तुला

सख्या माझं अंतरंग


तुझ्या भेटीसाठी उरी

माझ्या उमाळा दाटतो

तुझा  चोरटा कटाक्ष

हवा  हवासा वाटतो


खूप आवडते मला

तुझं चोरून पाहणं

समजून तू ही  घेई

माझं अबोल बोलणं


रोज चकोरासारखी

तुझी वाट मी पाहते

आणि सजून धजून

उभी दारात  राहते


तुला चोरून पाहता

कळी मनाची फुलते

तुझ्यासवे संसाराचे

स्वप्न  मनात  रंगते


काळजाची  हूरहूर

तुझ्या भेटीने संपावी

रेशमाच्या  बंधनात

गाठ लग्नाची बांधावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance