STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

वार झाले नेमके

वार झाले नेमके

1 min
314

एक क्षण नाही उमगले, काय झाले नेमके

आज हे नावे तिच्या, मज पत्र आले नेमके


बोल हे बोलून गेली, नेत्रभाषा ती मुकी

प्रेम म्हणजे काय ते, आता कळाले नेमके


लोचनांनी दोन मज त्या पाहिले काही असे

काळजावर हाय माझ्या, वार झाले नेमके


हाक ती ऐकून मी, सरसावलो होतो पुढे

चांदणेही त्याचवेळी, का निमाले नेमके


देह हा माझा प्रिये करतो हवाली मी तुझ्या

तू अता हृदयावरी मम घाल घाले नेमके


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance