सांग कधी कळणार तुला
सांग कधी कळणार तुला
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनाचा
बोल कधी चढणार तुला
रंग माझ्या प्रेमाचा
चंद्र मिलना आतुर झाली
बघ आकाशातील तारका
रोम रोम पुलकित करुनी
नसावा जीव प्रेमा पारखा
झाला आसमंत सुगंधित
भाव माझ्या अंतरी दाटे
गारव्याच्या धुंद ऋतूमध्ये
तुझा स्पर्श हवासा वाटे
सात जन्म तुझी सोबत
दे ना मजसी सख्या रे
सुख दुःख वाटूनी घेऊ
जोडू रेशीम बंध साजणा रे
सांग कधी कळणार तुला
विरह म्हणजे काय रे
शब्द होती मुके अन्
स्पंदनांना हे ठाव रे

