Manisha Awekar

Romance


3  

Manisha Awekar

Romance


शुभेच्छा

शुभेच्छा

1 min 165 1 min 165

वसुंधरेच्या शारदेला रम्य स्वप्न पडले

गानलतेचे अवनीवरी आगमन जाहले


सुकन्या अन् सुपुत्रानी गानवैभव वर्धिले

वडिलांचे नाव जगती अजरामर केले.


विनम्र भावे स्वर आळवुनी यशोमंदिर गाठले

लाभो दीर्घ आयुरारोग्य स्वर भारलेले


कठीण , बेभान वारा परिश्रमांनी सावरला

सुस्वर कंठे , रसिकमनी मोगरा फुलला.


सूर ताल लय हाती हात घेऊन नर्तले

संगीताचे गगन-सदन तेजोमय जाहले.


सुमधुर गीतांमधुनी रंग नवे भरले

भाव भोळे रसिक मैफिलीत रमले


गणरायांना आळविता , गणराज रंगी नाचले

रसिकांच्या गोकुळात विविध रंग भरले


सुखकर्त्या गजाननाची कृपा नित्य लाभो

जीवनात ही घडी अशी सुरेल राहो


चाफा बोलेना परि रसिक धुंद जाहले

संगीतमय जीवन सार्थकी लागले 


ऐरणीच्या देवाने दिग्गज किर्ती दिली

आभाळागत माया रसिकांची मिळविली


उठा उठाच्या भूपाळीने सुदिन आरंभले

नंदलालाच्या तालावरी लाल सुखे झोपले


गान सरस्वती संगीतक्षेत्री ध्रुवाचे स्थान

हृदयी जागा रसिकांना मिळेल काय?


गानलीले अवखळ खळखळ काळनागिनी सरसरली

लग्नमंडपी नववधू प्रिया बावरली


तिन्हीसांजा जरी पटलावरती रम्य रंग भरती

रसिक आजही आपणापाशी मधुघटचि मागती


स्वर दरवळ हा असाच राहो सदनी संपन्न 

स्वरप्रतिभेवर अशीच राहो सरस्वती प्रसन्न 


जीवनपथी ह्या असाच बरसो श्रावण प्रेमाचा

सुखस्मृतींचा आठव बहरो गानपौर्णिमांचा


Rate this content
Log in

More marathi poem from Manisha Awekar

Similar marathi poem from Romance