तुझ्यापेक्षा
तुझ्यापेक्षा
तुझ्यापेक्षा मी
तुला जास्त ओळखते
तुला न कळणार-या तुझ्या सवयी
मी जास्त पारखते
कारण...
तुझ्या ओठांपेक्षा तुझे डोळे
माझ्याशी खुप काही बोलतात
तुला जे न सांगायचे ते
सगळं मला नजरेतून सांगतात
आणि ...जेव्हा
जेव्हा तु माझ्याशी
हा .. नजरेचा लपंडाव खेळतोस
तेव्हा ...तेव्हा
तु माझ्यापासून .. लांब पळतोस
तु माझ्यापासून ...लांब जातोस ...

