खुणा
खुणा
1 min
309
आज माझ्या खिडकीला अनोळखी टकटक झाली
दुरदेशीची पर्ण फुले माझ्या अंगणात सांडली
कुठून आली ही पाहुणी .. कुठली वाट चुकली..
नाळ तुटलेल्या त्या जीवांसाठी मनात खळबळ उठली.
कसा करावा पाहुणचार .. कसे जोडावे नाते..
ह्या असंख्य विचारांनी माझी .. प्रश्न वेलं वाढली.
जरा निरखुन पाहता .. ती मुक भाषेत बोलली..
शब्द विरहीत संभाषणात... ती डोळ्यांनी ओघळली.
डोळयात दाटून आल्या त्यांच्या अंतरीच्या भावना
खोलवर झालेल्या जखमांच्या नयनी ठसठसल्या त्या खुणा
