क्षण
क्षण
1 min
188
पाहावा तो,
ऐकावा तो,
समजावा तो,
बोलावा तो हाच क्षण
जगावा तो हाच क्षण
काल हा गेलेला,
उद्या हा येणारा,
वर्तमान हा आलेला,
आता हा हाच क्षण
जीवन हा हाच क्षण
कालच्या झाडाचं फळ,
उद्याच्या रोपच बीज,
वर्तमानाचे सिंचन,
आताचे कष्ट हा हाच क्षण
आयुष्य हा हाच क्षण
कालची गुंतवणूक,
उद्याची पुंजी,
वर्तमानाचे बचत,
आताची कमाई तो हाच क्षण
अमुल्य संपत्ती तो हाच क्षण
