सावळ्याची सावली
सावळ्याची सावली
1 min
207
घेऊन आला तो नभ संगे
सावळ्याची सावली
यमुनेच्या किनारी विसावली
संध्या ही बावरी
नीलकमलाने हलकेच उलगडली
एक एक पाकळी
ह्या सुगंधाने मोहित झाली
सृष्टी ही सारी
हर्षित होऊन मृगाने
पावले ती थरकवली
चातकाच्या अमृत तृष्णेची
प्रतिक्षा ही संपली
मेघातून ओघळू लागल्या ...शुभ्र मोत्यांच्या सरी
मृदेने ही हलकेच उघडल्या.... अत्तरांच्या कुपी
वृंदावनीची राधा
ओथंबून न्हायली
मीराची भक्ती
पानापानातून गायली
जेव्हा घेऊन आला तो .... सावळ्याची सावली