भेट अनमोल
भेट अनमोल
स्मरली तुझी भेट अनमोल
हृदयी केले तिचे कोंदण
सुगंधी झाले हे जीवन
मनात केले त्याचे गोंदण
गंधाळला होता आसमंत
रंग प्रेमाचे गहिरे होते
अलवार या स्पंदनांना
श्वासाचे पहारे होते
अबोल त्या मूर्त भावना
डोळ्यांनी कळल्या होत्या
जपल्या त्या काळजात
रेशीम बंधाने जुळल्या होत्या
फुलले अंकुर प्रितीचे
प्रीतवेली ही बहरल्या
सूर झंकारले अंतरीचे
दशदिशा ही गंधाळल्या
आकंठ बुडाले प्रेमरंगी
अनमोल भेट मिळाली
जन्म आजन्म साथ लाभो
सख्या रे मी तुझीच झाली

