तुझी मिठी
तुझी मिठी
माझ्या मनातले वादळ शमवते....तुझी मिठी
मला माझीच नव्याने भेट करून देते.....तुझी मिठी
पोळलेल्या मनावर गार फुंकर......तुझी मिठी
सैर-भैर जीवाचा किनारा......तुझी मिठी
साऱ्या वेदनांचा विराम......तुझी मिठी
अमावसेच्या आभाळातिल चांदण...तुझी मिठी
मंतरलेल्या क्षणाची साक्ष.....तुझी मिठी
रोमा रोमात भिनलेला सुगंध.....तुझी मिठी
हृदयातील जलद स्पंदनांचे कारण....तुझी मिठी
कोवळ्या पानांवरील जणू दवबिंदू....तुझी मिठी
दुःखातही ओठी हसू फूलविते......तुझी मिठी
मरण यातनेत जगण्याची आस.....तुझी मिठी

