प्रेमात दरवळणाऱ्या गंधात
प्रेमात दरवळणाऱ्या गंधात
प्रेम एक अशी भावना जी हृदयापासून सुरू होते
चांदण्यांच्या त्या रात्रीत ती खूप जागवते
भावना आणि स्पर्शाचा हा गंध दरवळतो जेव्हा आसमंतात
चांदण्याच जणू खेळू लागतात रात्रीच्या अंधारात
धडधडणाऱ्या हृदयाला फक्त त्याची ओढ असते
अमावस्तेच्या रात्रीही वाटतं चांदण्याची बरसात होते
मधाळ दरवाळणाऱ्या सुगंधात वाटत लुप्त व्हावे
कधी त्याने तर कधी मी पापण्यांआड चोरून पाहावे
होकार तुझा येताच बेधुंद झालेल्या मनाने मनोसोक्त नाचावे
स्पर्श तुझा ओठांना होताच मी बंधनाचे पाश तोडावे.
तू कुशीत मला घेताच, मी शेवटी शांत निजावे
प्रेम एक अशी भावना शेवटी हृदयापर्यंत येऊन पुन्हा थांबावे.

