प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी
तू रे ऐलतीर
मी रे पैलतीर
तू निळाशार समुद्र
मी रे निर्मळ सरिता.
हट्ट तुला भेटण्याचा
प्रवास हा खूप
खाच खळग्यांचा
दरी खोऱ्याच
घनदाट जंगलाचा
पण हट्ट माझा
तुला भेटण्याचा
आयुष्य सारे हे
पाण्यातच तोलण्याचा
प्रीत तुझी-माझी जणू
आसमंतातली निळाई
तू करना जरा घाई
नाहीतर टळून
जाईल वेळ ही बाई
तू करना जरा घाई...

