पुन्हा नव्याने
पुन्हा नव्याने
हरवली होती स्वप्ने काही,
सापडली मला पुन्हा नव्याने..!
दुभंगलेली होती नाती काही,
सांधली ती मी पुन्हा नव्याने..!
तुटलेलीही होती जी मने काही,
जुळवली आता पुन्हा नव्याने..!
विस्कटलेली घडी अशीच मी काही,
सावरली एकदा पुन्हा नव्याने..!