कूटनीती
कूटनीती
बाजार हा सजला,
जिथे तिथे कूटनीतीसाठी.
सत्तेच्या हव्यासापायी,
खुर्ची मिळविण्याच्यापाठी.
बोलते मधूर निरागस,
कधी कापतील माना.
गिळंकृत हा केला.
माणुसकीचा खजाना.
माझ्या पुढे नको कुणी म्हणत,
नोकरीत भेटती पाय ओढणारे किती.
कुटनीतीचा बनून चमचा,
पुढे पुढे करणाऱ्याची मस्ती.
भ्रष्टाचाऱांची चादर,
अफाट पसरतेय आता.
गुंडगिरीने जगणारा,
सुखात जगतोय आता.
देवळात ताट नेणाऱ्यास,
मिळतो प्रसादाचा वाटा.
घराघरात घुसून शोधतोय,
कुटनीती ती पळवाटा.
जिथे तिथे दिसते आहे.
कुटनीतीचे साम्राज्य.
लढवून नात्यानात्यात,
चढाओढीचे चालते राज्य.
कळते पण वळत नाही,
काय घेऊन जाणार कोणी.
करावे जीवनाचे सोने की माती,
हीच तुझ्या जन्माची कहाणी.
