STORYMIRROR

Seema Gandhi

Abstract Others

4  

Seema Gandhi

Abstract Others

पाऊस असला की...

पाऊस असला की...

1 min
169

आताशा पाऊस परतला तर...

भरुनही नाही येत श्रावण मेघांसारखं...

पाऊस असला की कसं...

सोबतीला कोणीतरी असतं...

अन मनही कसं मोकळं असतं...

काही क्षण मनात साठून राहतात...

अन् पाऊस असला की कोसळत राहतात...

काळ्याकुट्ट मेघांसारखे भरून येतात...


पावसाची सारी रूप अंगी मिरवावी वाटतात...

क्षणभराचा शिडकावा...

कधी कोरडा ठक्क...

कधी इंद्रधनुषी दरबार...

कधी आभाळ भरभरून मिरवावे वाटते...


पाऊस कसा साऱ्या संदर्भांना सामावून घेतो...

अन् स्वतः ला वाटेल तसाच वागतो...

त्याच्या वागण्यावर उठू देत कितीही प्रश्नचिन्ह...

तो बदलत नाही त्याची गृहीतकं...

पाऊस असा एखाद्या निमित्तसारखा मनभर बरसत राहतो...!

वेळी अवेळी कोसळत राहतो...!!!


साऱ्या क्षणांना झुगारून पाऊस व्हावसं वाटतं...

मळभ दाटू देत कितीही, मोकळं तरी होता येतं...!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract