STORYMIRROR

Seema Gandhi

Others

3  

Seema Gandhi

Others

श्रावण माझ्या मनात असतो...

श्रावण माझ्या मनात असतो...

1 min
287

श्रावण माझ्या मनातच असतो...

कुठली समीकरणं...

कुठल्या व्याख्या...

काहीच माहीत नसतं...

धुंद

अवखळ...

झिम्माड...

शब्दांचे 

वेड्या मनाचे

विभ्रमाचे खेळ मांडले की...

तोही रिमझिमतो ...

माझ्या मनातलं आभाळ

श्रावणाच्या मनात भरून आलं की तो असीम बरसतो...

त्याच्या माझ्या मनाच्या तळावर सुखस्वप्नांचे इंद्रधनु चकाकले की 

निळ्या सावळ्या मेघांची अस्तर 

मनावर ...अक्षरांवर लपेटून

श्रावण माझ्या मनात असाच रिमझिमत असतो...

काळावेळाचे बंधन न पाळता...



साहित्याला गुण द्या
लॉग इन