तू
तू
तू -
एकाच दिवसात कसं वाचू शकशील?
भरलेली ,बहरलेली
अन,
अजूनही अर्धवट राहिलेली
पानं.
मी अजूनही पूर्ण मावत नाहिये
प्रयत्न तर करतोय न
पण भविष्याचा विचार करता
मध्यात लुडबूड करत राहतो भविष्य,
बिचारा वर्तमान -
बुद्धाच्या लेणीत कोरलेल्या
स्मितहास्याच्या भावमुद्रेत
मी -
स्वतःला लिहायला एवढी वर्षे घालवली
अन
तू
एका दिवसात वाचायचं म्हणतेय