STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract

3  

Sharad Kawathekar

Abstract

होकाराची दिशा

होकाराची दिशा

1 min
450

अजूनही मी जिवंत ठेवल्यात

त्या सर्व जागा...

आपली स्पर्शातून झालेली ओळख 

तो मोरपीस....

असंच बरंच काहीबाही 

आणि हो....

अगदी त्या दिवशीच 

सावलीला स्पर्शुन गेललं ऊनही

मी अजूनही जिवंत ठेवलंय

आणि तो क्षण

जो आपण दोघांनी मिळून अनुभवला होता 

ज्या क्षणी त्या मौनाच्या जंगलातली

ती मौन झाडही स्वतःच

स्वतःच्या वलयाशीच मौनातून संवाद करत होती 

आणि तो अवतीभवती पिंगा घालणारा

वेडावारा कातरवेळेचा निरोप घेत घेत 

अलगद कुठल्याशा काठाला पोहोचत होता 

ज्या ठिकाणी ...

आपलं वाळूवरचं भिजलेलं गाणं 

उगीचच रेंगाळत हो

पुन्हा एकदा जिवंत होण्याच्या इराद्यानं

कदाचित ...

नकाराच्या दिशेतून होकाराच्या दिशेकडे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract