एक दिवस मनासारखा..
एक दिवस मनासारखा..
हो ...
आज मी करणार आहे माझ्या मनासारखे सर्व काही...
कारण...
आज घरात कुणीही नाही...
कामांची नको गडबड घाई....
लेट येणार आहेत आज कामे करणारी ताई..
आज मी माझ्या मनाची राणी...
स्पीकर लावून ऐकते रोमॅन्टीक गाणी...
गरम गरम वाफाळलेला चहा कधी प्यायली होती,
आठवतच नाही ...
नको रोजचाच पोहे, उपमाचा नास्ता...
मी खाणार आज चीझ पास्ता....
आरशात पाहिले स्वतःलाच नीट...
मग केला थोडा योगा दिसायला फिट...
दिवसभराच्या कामाची केली मी लिस्ट...
माझीच मी स्वतः ला देणार आहे फिस्ट..
असा माझ्या मनासारखा....
असेेेल हा एक दिवस खास....
