सारा आसमंत कवेत माझ्या
सारा आसमंत कवेत माझ्या
नारी शक्तीची किमया न्यारी
शत्रूंवर असे नेहमीच भारी
सारा आसमंत कवेत माझ्या
अन्यायाला ती ठेचून मारी..!
मनात माझ्या प्रेमाची भावना
प्रत्येकानेच जपावा स्वभाव
सारा आसमंत कवेत माझ्या
रचू नये कोणी कोणताही डाव..!
आपुलकी सह प्रेमाचे नाते
ठेऊनिया द्यावे प्रोत्साहन
सारा आसमंत कवेत माझ्या
करा आनंदी नारी जीवन..!
कर्तव्याची जाणीव मजला
जिद्द चिकाटी भरारीसाठी
सारा आसमंत कवेत माझ्या
ह्या गरूड झेपा पोटासाठी..!
स्त्री शक्तीला जागविन मी
त्या दु:खाशी करीन सामना
सारा आसमंत कवेत माझ्या
सर्वांच्या सौख्याची कामना..!
