पळस फुलं
पळस फुलं
पळस फुलांची ,फुलं जमविली
वेळीच,
आणली वेळुची,पिचकारी।।धृ।।
गुलाल शेंदूर, अबिर भंडारं
उधळू,
लाल रंग बेरंग,पिचकारी।।१।।
ए बडा लाल है,बुड्डी का बाल है
वाहू,
लाखोली शिव्यांची,गुणकारी।।२।।
गोळीवर गोळी , बंदुकीची गोळी
होई,
साहेबाची चड्डी ,विटकरी ।।३।।
खोटी अन्तयात्रा,खोटी रडमात्रा
गडे,
सजे प्रेत यात्रा ,भरजरी।।४।।
बुहारा होता रे ,कंजुस होता रे
चाले,
उत्सव स्वभावे ,ललकारी।।५।।
उत्सव रंगाचा,रंग स्वभावाचा
गाऊ,
रंगाचा महिमा,झडकरी।।६।।
