सरत्या वर्षा निरोप तुला
सरत्या वर्षा निरोप तुला
कधी कृष्णा सम रास केला
कधी कंसासम तु छळाला
कधी गोपिकांना रंगविला
कधी क्रोधाने दनानला
हे सरत्या वर्षा निरोप तुला...
कधी रामासम वनवास दिला
कधी रावणासम घमंडी झाला
कधी सीतेसम परीक्षा घेतला
कधी रामायणाचा तर
कधी महाभारताचा भाग झाला
हे सरत्या वर्षा निरोप तुला
कधी फुलपाखरा सम आनंदला
कधी फुलातला मकरंद झाला
कधी कंवटाळले दुःखाला
कधी जिंकले यश मे जीवनाला
हे सरत्या वर्षा निरोप तुला
कडूगोड आठवणींचा मेवा दिला
नकळत कधी तुझा संप झाला
तुझा संप मनास क्षनाही जाणवला
हे सरत्या वर्षा निरोप आज तुला.
