STORYMIRROR

Meera Bahadure

Inspirational Others

3  

Meera Bahadure

Inspirational Others

आयुष्य खुप छोटा आहे.

आयुष्य खुप छोटा आहे.

1 min
190

शरीर अमृत होण्याआधीच आणि अलिंगण द्यावे

भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगावे


आयुष्य खूप छोटे आहे भांडत नका बसू

 डोक्यात राग भरल्यावर फुटणार नाही हसू


बाळगू नका अहंकार दूर करा अबोला

मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंत पणीबोला


नातं आपलं कोणतं महत्त्वाचं नाही

प्रश्न तोच कधी गोड बोलता का नाही


काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू

आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू


दारात पाय नको ठेवू तोंड नाही पाहणार

खरं सांगा असं वागून कोन सुखी होणार


सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही

 आपलं माणूस आपलं नसणे दुसरे दुःख नाही


नात टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं

कधी बाई नं तर कधी पुरुषांनी नात्यात झुकाव


विचार करून पाऊल टाका कुठे नका फसू

आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational