कणभर सुखासाठी
कणभर सुखासाठी
1 min
105
मानवाचा आटापिटा
मुठभर पोटासाठी
वणवण भटकतो
कणभर पोटासाठी
कष्ट करतो अफाट
फळ मिळेल गोमटी
दुःख सरल वाटतं
सुखाची होईल पहाट
संघर्षाने मानवाचं
आख्ख आयुष्य झिजल
धावपळीच्या युगात
अंग घामाने भिझल
दुखाचे पंख छाटून
लावतो सुखाला
टिचभर पोटासाठी
कलाटणी देतो जिवनाला
असा कसा रे मानवा
तु सुखाच्या अधिन
कणभर पोटासाठी
दिला स्वतःला झोकून
