त्रिगुणावतार
त्रिगुणावतार
विझू लागताच नीती
जगी वाढते अनिती
जगी देव जन्म घेती
संत रूपे //
सत्व रज तम तत्वे
ब्रम्हा विष्णू महेशाची
भक्तांसाठी तीनसत्वे
दत्तरूपे //
अत्री मुनीचा सुपुत्र
विष्णू रूपे सदा सवे
एक मुखी दत्त रूप
कृपा करी //
अनुसूया थोर पत्नी
सत्व सतीचे तिच्यात
देव तीज पोटी येती
दत्त नामें //
गाणगापुरात तप
अवधूतानी मांडले
करु श्री दत्ताचा जप
भक्ती भावे //
स्वामी समर्थ रूपात
अक्कलकोटी राहिले
साईनाथ ते शिर्डीत
दत्त रूपे //
गजानन महाराज
शेगावात प्रकटले
धर्म बंधूत्वाचे काज
साध्य केले//
सन्यासी सदा राहिले
मृत धर्मा जागविले
भक्त रक्षणा धावले
दत्त गुरु //
भक्तीभावे मी स्मरते
साकडे तया घालते
दत्त दर्शना धावते
श्रद्धा भावे//