संधीच सोनं करावं
संधीच सोनं करावं
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस
संधी मिळेल तुलाही
लगेच हिरमुसून जाऊ नकोस
उठ उघडून डोळे
पहा जरा जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात
संधीचे नाचते घोडे
मिळालेल्या संधीचा सोन कर
आयुष्य खुप सुंदर आहे
तू टिकून बघ
नाही नाही म्हणून
उगाच कुढत बसू नको
सामर्थ्य आहे हातात जर
स्वप्नांना पंख लावून बघ
मिळालेल्या बळाने झेप घेवून बघ
परिस्थितीशी भिडवून छाती
दोन हात करत चला
विजय हा तुझाच असेल
मागे वळण्यास नकार कर
मिळालेल्या संधीच सोन कर
आयुष्य रोज नवे दिस देते
आता भविष्याशी झगडायच
की वर्तमानात बागडायच
यालाच तर म्हणतात संधीच सोनं
मिळालेले क्षण आनंदाने जगणं.
