छळतो आभास हा.
छळतो आभास हा.
छळतो आभास हा
यौवनाच्या फुलवारी
कोणी केली चित्त चोरी
जागते रात्र रात्र सारी
वाजे मधुरस्वरी बासरी
एकांताचा त्या कुंजवनी
नाचती यमुनेच्या जललहरी
वाऱ्यावरती भान हरपूनी
लोभसवाणी श्याम निळाई
रेखियली मी सुंदर डोळा
हसरे त्यात प्रतिबिंब
मयूरतुरी कृष्ण सावळा
छळतो आभास हा
सावळ्याची होता बाधा
का वाटे बासरी वैरीण
कासावीस होई राधा
बंधपाश राधेला किती
दुराव्याचा धगधगतो वणवा
प्रीतरसाचे रिक्त प्याले
आठवांच्या भिजती दंवा
प्रेम दीवानी राधाराणी
कृष्ण कृष्ण जपात न्हाली
युगायुगांची ही महती
चराचरी व्यापून राहिली...
