माझा बापच माझी आई
माझा बापच माझी आई
जन्म देताच मला
हरवली मायेची सावली
मग माझा बापच झाला
माझा बाप माझी आई
दुध पाजतो गाईचे
चारा चिऊ काऊ परी
होते घुसमट त्याची
तरी गातो तो अंगाई
वय नसे ते खायचे
दात नव्हते तोंडात
तरी भरवला घास
मन हंबरडा फोडत
आठवन येता मायेची
रडे दूर ते जाऊन
हसू गालावर येई
माझं मला खेळताना पाहून
शाळेत सोडाया येई माझा बाप
इवल्याशा हातातून सुटेनासा त्याचा हात
दोन जिवावर तो जाई मला सोडून
सुट्टी होताच येई भरधाव घेऊन
माझा वय वाढलं
लहानाची मोठी केलं
झालं होतं आता माहेरही परक
केविलवाणी माझा बापच जगणं
तो झाला शेवटी आई होण्यात मगन..
