STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Classics Inspirational Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Classics Inspirational Others

मानाचा मुजरा

मानाचा मुजरा

1 min
372

माय मराठी स्वीकार तू

मान-मुजरा या भक्ताचा

तुझ्याच पायी समर्पित

कणकण हा रक्ताचा  ¦¦१¦¦


तुझ्याच रक्षणासाठी क्षणक्षण

तिष्ठत मर्द मावळा इथला

तुझ्या पोटी जनन माते  

धन्य जन्म हा जाहला  ¦¦२¦¦


माय तू सर्वस्व आमुचे

नव्हे फक्त तू एक भाषा

विश्वरूप तुजला लाभावे

हिच मनी मानसी आशा ¦¦३¦¦


तुझ्याच चैतन्यातून माते

प्रसवली मराठी संस्कृती

दिगंतात पसरो सदैव

तुझ्याच थोरवीची किर्ती ¦¦४¦¦


तुझी गोडीच अवीट

अमृतानेही लाजावे

शब्ददरिद्री मी माते

गुण किती तुझे गावे   ¦¦५¦¦


अलंकाराने मढलेली

तुझ्या लावण्याची खाणी

भावस्पर्शी भिडलेली

साऱ्या बोलींची तू राणी ¦¦६¦¦


"माय"म्हणूनच आम्ही

साद तुजला घालतो

वैश्विक तुझ्या रुपासाठी

पदोपदी झगडतो     ¦¦७¦¦


मायदेशी रहावे वा

जावे परक्या देशास

अवघ्या ब्रह्मांडात भासे

माय मराठीचा वास   ¦¦८¦¦


ज्ञानदेवे सांडियले

दीपिकेच्या ओव्यांतून

सुधा जीवास तारते

माये तुझ्या पान्ह्यातून  ¦¦९¦¦


भजन,किर्तन ,भारुड

गवळणी कर्णमाधुरी

पोवाड्याची मर्दानगी

आम्हा माहेरची शिदोरी ¦¦१०¦¦


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics