STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

3  

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

मानाचा मुजरा

मानाचा मुजरा

1 min
356


माय मराठी स्वीकार तू 

मान-मुजरा या भक्ताचा

तुझ्याच पायी समर्पित

कणकण हा रक्ताचा   ¦¦१¦¦


तुझ्याच रक्षणासाठी क्षणक्षण 

तिष्ठत मर्द मावळा इथला

तुझ्या पोटी जनन माते   

धन्य जन्म हा जाहला  ¦¦२¦¦


माय तू सर्वस्व आमुचे 

नव्हे फक्त तू एक भाषा

विश्वरूप तुजला लाभावे

हिच मनी मानसी आशा  ¦¦३¦¦


तुझ्याच चैतन्यातून माते

प्रसवली मराठी संस्कृती

दिगंतात पसरो सदैव 

तुझ्याच थोरवीची किर्ती  ¦¦४¦¦


तुझी गोडीच अवीट

अमृतानेही लाजावे

शब्ददरिद्री मी माते

गुण किती तुझे गावे    ¦¦५¦¦


अलंकाराने मढलेली

तुझ्या लावण्याची खाणी

ऊतभावस्पर्शी भिड

लेली

साऱ्या बोलींची तू राणी  ¦¦६¦¦


"माय"म्हणूनच आम्ही 

साद तुजला घालतो

वैश्विक तुझ्या रुपासाठी 

पदोपदी झगडतो     ¦¦७¦¦


मायदेशी रहावे वा 

जावे परक्या देशास

अवघ्या ब्रह्मांडात भासे  

माय मराठीचा वास    ¦¦८¦¦


ज्ञानदेवे सांडियले

दीपिकेच्या ओव्यांतून

सुधा जीवास तारते 

माये तुझ्या पान्ह्यातून  ¦¦९¦¦ 


भजन,किर्तन ,भारुड 

गवळणी कर्णमाधुरी

पोवाड्याची मर्दानगी 

आम्हा माहेरची शिदोरी  ¦¦१०¦¦


औचित्य कवितेचे आज 

अस्तित्वाचा "म्हणे" प्रश्न 

आम्ही जागृत सक्षम 

छत्रपती शिवबासमान  ¦¦११¦¦


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational