STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

दिव्यप्रकाश

दिव्यप्रकाश

1 min
126

लक्ष लक्ष दीप प्रज्वल

आसमंतास उजळतील

दीपावलीचे पर्व पावन

तम मनातील क्षालतील...१


आगमन दिपोत्सवाचे होता

सकल तिमीराचा होईल अंत

उत्सव व्हावा मनामनांचा

फुलावे हास्य, नुरावी खंत...२


कुंद कळ्या त्या आनंदाच्या

सजाव्या जीवन वेलीवरी

गंधीत होईल जगत मनाचे

साद घाल त्या अलगद हसरी...३


पणत्यांच्या लखलखाटाने

पुनव भासे अवसयामिनी

पूजन जरी हे विष्णूप्रियेचे

आदरावी जीवनसंगिनी... ४


कन्यारुपी लक्ष्मींचाही

बाळगावा अभिमान

मग अपुली वा परकी ती

मनी ठेवा मानसन्मान... ५


प्रकाशाने लख्ख व्हावी

जन अंतरांची दालने

काळोखाची शाल फेकून

प्रितीसागर व्हावी लोचने...६


दिव्यप्रकाशात चिंब व्हावे 

निरागसता मनी जन्मावी

स्वार्थ,असुया विरुन जाव्या

मानवतेची गंधीत बाग फुलावी...७



साहित्याला गुण द्या
लॉग इन