STORYMIRROR

PRIYANKA Balsure

Action Others

4  

PRIYANKA Balsure

Action Others

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min
220

लॉकडाऊन

"पुन्हा लॉक'डाऊन!"


होय साहेब, पुन्हा बिनधास्त

'लॉकडाऊन करा'

पण आधी गरिबांच्या घरचा

'किराणा भरा'...


ही नुसती बातमी ऐकून

सैरभैर झालेत कित्येक जीव,

हातावर पोट असणारांची

येउद्या थोडी कीव...


पहिल्या लॉकडाऊन मध्ये

कित्येक जीव उपाशी अन चालून चालून मेले,

बिचारे घरी जाण्याऐवजी 

थेट स्वर्गातच गेले..


MPSC नाही होऊ शकली

पण सभा आणि निवडणूका मात्र झाल्या,

एकदा आकडा सांगा साहेब

होत्या त्या नोकऱ्याही किती जणांच्या गेल्या.?


लस नव्हती तेव्हा 

लसीची होती आशा,

आता लस आली तरी 

लाटा उसळतात कशा.?


कोरोना नसला तरी आता

पार उध्वस्तच झालीय परिस्थिती,

विस्कटलेल्या आयुष्याची 

घडी बसवावी तरी किती.?


होय साहेब ,

बिनधास्त 'लॉकडाऊन करा'

पण आधी अशा

उध्वस्त घरचा 'किराणा नक्की भरा'!


-सुशिक्षीत बेरोजगार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action