पहिला वहिला पाऊस
पहिला वहिला पाऊस
हा पहिला पाऊस आणि थंड वारा तुझ्या जवळ असल्याचं भासवतो...
ही रिमझिम तुझ्या मनातल्या कवितांची मधुर गाणी ऐकवतो...
हा तिरपा पाऊस वारा स्वप्नी सजलेल्या माझ्या त्या इंद्रधुष्या मध्ये मला घेऊन जातो..
पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर शहारा आणतो जेव्हा तुझा पहिला स्पर्श जाणवतो..
हा मातीचा दरवळ आणि गरम कांदा भजी आणि त्या वाफाळलेल्या चहाची आठवण करून देतो..
पक्षाचा किलबिलाट आणि रंगबेरगी फुलांचा सडा पडलेला नकळत स्वतःच्या प्रेमात पडतो..
पाई असलेले पैजण आणि ह्रुदयात होणारी धडधड काहीतरी वेगळाच इशारा मजला देवून जातो..
हा गार वारा तुझ्या हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या स्वप्नी मला घेऊन जातो...
हा नकळत आलेला पाऊस आणि त्या बरणाऱ्या सरी मला तुझ्या प्रेमात पाडतो...
ओसरलेल्या सरी आणि मातीचा सुगंध तू जवळ आहेस असा सांगून जातो...
हरवलेले हे मन बावरे होऊन तू दिलेल्या आठवणींचा आनंद नकळत साजरा करतो...
हा पहिलावहिला पाऊस सगळीकडे आनंद आणि छान आठवणींचे क्षण मनात साठवतो..

