राधा ही बावरी
राधा ही बावरी
प्रेमाच्या रंगात रंगली ही वेडी राधा
कोणी आहे का कृष्ण मुरारी जो साद घालेल राधेला..
ती बट येई गालांवरती होई जीव हा आधा
कोणी आहे का कृष्ण हरी जो आनंद देईल राधेला..
प्रत्येक रंग पाहुनी कृष्ण ही नकळत बोलतो राधा राधा
कोणी आहे का नंद लाला जो आपल्या पाशी बोलावेल राधेला..
पायातले पैंजणाचा आवाज आणि बांगड्यांची किणकिण साद घालते मनाला
कोणी आहे का माखन चोर जो हळूच येऊन दिसला फक्त अन फक्त राधेला..
रंगात रंगली राधा कृष्णाची बासुरी ऐकून राधा लागली नृत्य करायला
कोणी आहे का नंद यशोदेचा जो हळूच येऊन कानी बोलेल आमच्या राधेला..
हरपून गेले भान राधेचे आणि तिच्या समवेत आसमंत दुमदुमू लागला
कोणी आहे का कान्हा जो हळूच चोळी तिची ओढत सतवेल का राधेला..

