येशील परत
येशील परत
1 min
528
येशील परत
विजेच्या कडकडाटात
बरसणाऱ्या धारांनी
रोमांचित करणाऱ्या
गार हवेच्या झुळकेने
उल्हासित करणाऱ्या
मनाला मोहित
करण्यासाठी
येशील परत
एकाच छत्रीतल
तुझ माझ असण
तुझ्या सहवासाची
जाणीव करून देण
क्षणाक्षणाला भारण्यासाठी
येशील परत
स्मृतीच्या पाखरांचे थवे
निळ्या नभांगणात
कधी दूर गेले
कळलंच नाही
विस्मृतीत गेलेल्या
स्मृती जपण्यासाठी
येशील परत
