STORYMIRROR

Sneha Kale

Abstract Inspirational Others

3  

Sneha Kale

Abstract Inspirational Others

धावपळीचे जीवन

धावपळीचे जीवन

1 min
178

धावपळीचे जीवन सध्याचे

नाही क्षणभरही विश्रांतीचे


पैसा पैसा करत मागे त्याच्या पळत राहायचे

पळता पळता मात्र राहून जाते उपभोगायचे


पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत असते दिवस रात्रीची 

शरीर थकतं मनही थकतं काळजी नसे आरोग्याची


कामात इतके गुंतून जातो 

आप्तजनांनाही विसरून जातो 


नातीगोती विसरली जातात 

सणवारही साजरे करायचे राहून जातात


शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचतो जेव्हा आयुष्याचा खेळ

तेव्हा लक्षात येते की आता संपून गेली वेळ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract