खेळ भावनांचा
खेळ भावनांचा
1 min
183
नसे भरवसा हल्ली माणसांचा
खेळ चाले केवळ भावनांचा
जीव मुठीत धरून लागे जगावे
न जाणो दुसऱ्याच क्षणी काय ऐकायला मिळावे
अचानक होत्याच नव्हतं होऊन जाई
चालता बोलता मनुष्य आजारपणात गुरफटून जाई
दिवसच नाही रात्रही वैऱ्याची भासे
ढकलत जगावे दिवस अन रात्र कसेबसे
आता सुदृढ शरीरासह मनही कणखर करावे लागेल
अनपेक्षित कळणारी बातमी पचवावी लागेल
