STORYMIRROR

Sneha Kale

Tragedy Others

3  

Sneha Kale

Tragedy Others

उध्वस्त मनाची व्यथा

उध्वस्त मनाची व्यथा

1 min
174

अपेक्षा नव्हती कशाचीच देत गेले सर्व काही

देता देता मात्र माझी ओंजळ राहिली रिकामी


दुर्लक्ष करून स्वतःला विचार केला इतरांचा

मात्र कोणी नाही केला विचार माझ्या मनाचा

क्षणोक्षणी दुखावले मन माझे अगणिक वेळा रडले

तरीही मनातलं दुःख कधीही चेहऱ्यावर येऊ नाही दिले


प्रामाणिकपणे कर्तव्य माझे आयुष्यभर करत राहिले

माझ्या प्रेमाचे मोल मात्र कोणी नाही जाणले


डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून लोकांशी वागले

इच्छा नसली तरी मी नातं टिकवण्याचा प्रयत्न करत राहिले


ज्यांना आपलं मी मानलं त्यांनी मला कधीच नाही स्वीकारलं

मी परकी म्हणून मला नेहमीच दूर लोटलं


खूप त्रास होतो जेव्हा आपलेच आपल्याशी असे वागतात

इतरांचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतात


प्रेम दिल्याने प्रेम वाढतं असं ऐकलं होतं कुठेतरी

माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट कधीच नाही होणार खरी


वाटलं होतं मला माझ्या चांगल्या वागण्याने लोक थोडीफार बदलतील

पण मला हे माहीत नव्हते की लोकं त्यांच्या स्वभावानुसार वागतील


शांत कसे होऊ मन झाले आहे उध्वस्त

नुकसान झाले खूप कधी होईल वादळ शांत


ठरवले मनाला नाही लावून घ्यायचं झालं गेलं विसरून जायच

भूतकाळ उकरून काढण्यात काय अर्थ वर्तमानात जगायचं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy