STORYMIRROR

Sneha Kale

Abstract Classics Inspirational

3  

Sneha Kale

Abstract Classics Inspirational

शब्दसंपत्ती

शब्दसंपत्ती

1 min
291

शब्दाला जोडून शब्द आले की होते नव्या शब्दांची निर्मिती

नवे अर्थ नवे वाक्य नवी रचना हीच असते शब्दसंपत्ती


शब्दमोती एकत्र येता कधी बनते कथा तर कधी कविता

शब्दांतूनच व्यक्त करता येती सगळ्या भावना


शब्दांविना आहे आपले जीवन सुने सुने

शब्दांसवे जगणे न शब्दांसवे मरणे


शब्द रूप, शब्द गंध, शब्द स्पर्श, शब्द आहे रस

शब्द आहे लोखंडाला सोने करणारे पारस


शब्दांना मिळुनी सुरांची साथ

मधुर असे गीत बनतात


प्रेमळ शब्दांनी कधी मायेने गोंजारले जाई

कधी कठोर शब्दांनी मनावर ओरखडे ओढले जाई


शस्त्रवारापेक्षा शब्दवार असे अधिक त्रासदायक

न भरून निघणाऱ्या जखमा होई मानसिक


विचार करुनी बोलावे आणि वापरावे शब्द जपून

खोलवर रुजणाऱ्या जखमांतून बाहेर पडणे होई कठीण



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract