STORYMIRROR

Sneha Kale

Children Stories Inspirational Children

4  

Sneha Kale

Children Stories Inspirational Children

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

1 min
411

जीवनातील सर्वात उत्तम काळ बालपणीचा

न कळे तेव्हा पण तो असे सर्वात सुखाचा


खेळता खेळता ऑफिस ऑफिस अन भातुकली

कळलंच नाही कधी जबाबदारी आली


शाळेचे दप्तर ओझे वाटायचे शाळेत जाताना

त्या आठवणी उचंबळून येतात जबाबदारी पेलताना


नव्हते घड्याळ कोणाकडे वेळ होता भरपूर

महागडी घड्याळ घालून आज नाही देता येत वेळ पुरेपूर


अहंकार गर्व ईर्ष्या आमच्या लेखीच नव्हतं

फक्त जगायचं मनसोक्त एवढेच ठाऊक होतं


जमाना आला अत्याधुनिक अन महागडी खेळण्यांचा

नसे तोड त्याला कागदी जहाजे आणि विमानांचा


नव्हता कधी धोका जंतू पसरण्याचा

काळ होता तो एकमेकांचा डबा खाण्याचा


मोठे झाली आमची पिढी मैदानी खेळ खेळून

हल्लीच्या मुलांना मोबाईलने टाकले आहे बांधून


निरागसता हरवली लवकर आलेले शहाणपण

आजकालच्या मुलांचे खरंच हरवले आहे बालपण


फोटो पाहून पुन्हा लहान व्हावे असे वाटते

कारण मोठेपणा पेक्षा बालपण समाधानी होते


बालपण म्हणजे फक्त खेळणं बागडणं हेच असतं

मोठं झाल्यावर मात्र शर्यतीत धावायचं असतं


Rate this content
Log in