जादू ( अभंग रचना )
जादू ( अभंग रचना )
ऊन पावसाचा । खेळ रंगलेला ।
निसर्ग आपला । जादू दावी ॥ १ ॥
सप्तरंगी नभी । इंद्रधनु पहा ।
मोजतच रहा I रंग जादू ॥ २ ॥
वीज चमकती । धुवाधार धारा ।
सुसाटच वारा । चमत्कारी ॥ ३ ॥
रौद्र रूप घेता । निसर्ग आपला ।
अतिरेक झाला । जादूचा या ॥ ४ ॥
किशोर स्तब्धतो । निसर्गा पाहुनी ।
जादू ती लोचनी । साठवून ॥ ५ ॥
