श्रावण
श्रावण

1 min

274
तृण हलवीत वृक्ष डोलवित वायुने निरोप दिला,
सरी उधळत थेंब नाचवत, मास हा श्रावण आला
अंकुरले सारे पान पान झाले हिरवे हिरवे हे रान रससरल्या लतावेली सुगंध कळीत भरुन
रंगरंगवत पुष्प फुलवत मास हा श्रावण आला
येती मेघ स्वप्न अंतरी घेऊन
लाजत पाहती चांदण्या बहर प्रितीचा खुलऊन
सुर्य लपवत पृथ्वी न्हानत मास हा श्रावण आला
काट्या विनल्या घरट्यात थंड शिखा हळूच शिरे
धडकी भरल्या हृदयात फळफळती नवी पाखरे
बोरी अंकुरत बाभळी पिवळत मास हा श्रावण आला
लाह्या पंचमीच्या घरीदारी नंदी झुलती मंदिरी सोहळ्यात खुलल्या नारी पुजन वारुळा करी
हर्ष अर्पित नाग डोलवीत मास हा श्रावण आला हा श्रावण आला...