Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Action Inspirational Others

3  

Yogita Takatrao

Action Inspirational Others

पतंग

पतंग

1 min
8


आयुष्याचा पतंग उडवायला..

मांजा माझ्याच हाती हवा ,

हवेचं काहीच खरं नसतं

तिला लागतो पतंग नित्य नवा !

शर्यतीत भाग नाही घ्यायचा..

पण..ध्येय बाळगून आहे आगळं ,

उंचच उंच उडण्याच्या नादात

नको मध्येच कापलं जाणं !

गुंतागुंतीच्या गोंधळात..

मार्ग जातो आपलाच विरून , 

पुन्हा तोच मांजा अन् पतंग

तिकडेच अडकतात फिरून..फिरवून !

तू पण नको उडू..मी पण नाही..

एकमेकांना खाली खेळण्याच्या खेळात ,

दोरी तुटतेच पतंगांची साऱ्या 

अंतर प्रगतीचे कापण्यात !

हक्क आहेच सर्वांना..

उंचच उंच उडण्याचा ,

आपापलं उडावं ना मस्त..मुक्त 

जसे आकाशात विहरतात विहंग !

ते नाही ताणत एकमेकांचे दोर..

खेचून नाही टाकत पंख ,

भ्रमणमार्गात असणाऱ्यांचा  

करत नाहीत शंख !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action