चैतन्य
चैतन्य
कुजबुज शांततेची..
आला घेऊन हिवाळा ,
हिमकण सजवत
उत्सवाचा पावसाळा !
झाडांवर थर शुभ्र..
झाली हिमवृष्टी खूप ,
चोहीकडे बर्फातून
डोकावते हृद्य रूप !
नदी गोठली थरांत ..
तिची थांबे चंचलता ,
थरांखाली मात्र तिच्या
झरा चैतन्य वाहता !
एक वाट जाते मध्ये..
दोन्ही पर्वत बाजूस ,
माती दिसतही नाही
जणू सर्वत्र कापूस !